घनदाट तिमिर हा दाटे, मी स्वत:स झोकून देतो
क्षण अंधाराचे काही, मी सहज पांघरुन घेतो
छेडून कोण जाते, ही हळवी तार मनाची
तो चंद्र नभीचा तेंव्हा, त्या सुरात भिजूनी जातो
उजळेल कधी का नकळे, ती पूर्व दिशा गगनाची
होईल कधी ना ठावे, बरसात ती फुलांची
या अंधाराशी आता, आयुष्य बांधतो आहे
मग फिकीर नाही मजला, या झरणाऱ्या अश्रूंची