अभिनव पसायदान

आता भासात्मके देवे। येणे वाग्यज्ञे कोपावे|
कोपोनी मज द्यावे। कसाबदान हे||

जे सुष्टांची वीरता सांडो। तया निराकारी रती वाढो|
दुष्टा अकस्मात जडो। प्रेम शांतीचे||

दुरिताचे जीवित जावो। विश्व अधर्म सूर्ये पाहो|
जो जे ढापील तो ते लाहो| प्राणिजात||

गर्जत विकल मंडळी| नश्वरनिष्ठांची मांदियाळी|    
धडपडत भूमंडळी| भेटतू भूता||

करा हीनबुद्धीचे तांडव| वासनाविकृतींचा ठाव|
बोलती हे पुंगव| तर्कट्यांचे||

मानवास जे लांच्छन| मुखंड जे बुद्धिहीन|
ते सत्याचे सदा खंडन| करिते होतू||

किंबहुना सर्व सुखी| मत्त होवोनी तिन्ही लोकी|
त्याजिजो आदिपुरुषी| अखंडित||

आणि ग्रंथोपजीविये| विशेषी लोकी इये|
इष्टानिष्टनकळे| होआवेजी||

येथ म्हणे श्रीक्रौर्येश्वरावो| हा होईल दानपसावो|
येणे वरे हरिभक्त| दुखिया झाला||

[किमान पसायदानाचे तरी कालसुसंगत असे लिखाण करून विश्वास अंतिम सत्याप्रत नेण्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा एक प्रयत्न. येथील बुद्धिनिष्ठ, सत्यनिष्ठ, सृजनशील विचारवंत आणि साक्षात्कारी संतांपुढे संपादनासाठी ठेवत आहे. ]   

देव - स्किझोफ्रेनिया च्या रुग्णांना होणारा एक आभास (आधुनिक विज्ञान आणि अत्याधुनिक मनोविज्ञानानुसार)

वाग्यज्ञ - काहीच्याबाहीच बोलणे

कसाब - आज का अर्जुन! भारत या रानटी देशाने यास देहदंडाची क्रूर शिक्षा ठोठावली.

सूर्य - एक इंपोर्टेड देवता. वैदिक लोक इस्त्राईल मधून ढापलेल्या 'गायत्री' या हिब्रू भाषेतील मंत्राने याची उपासना करतात असे बालपणी 'विचित्र विश्व' मध्ये वाचल्याचे पुसटसे स्मरते.