लाभले आम्हास भाग्य... (भाग २)

जुने अनुभव सांगण्याआधी आजच आलेला ताजा ताजा अनुभव आधी लिहीते...

मी ऑफिस मधे आले....तेव्हा ह्या सगळ्या कँटीन मध्ये जायच्या तयारीत होत्या... तुम्ही पुढे व्हा मी आलेच... असे सांगून मी माझ्या जागेवर येऊन बसले. लॉगईन करून मग कँटीन मध्ये गेले तेव्हा या मुलींचा घर घेणे हा विषय चालू होता...

आज सोबत मुक्ती सुद्धा होती... ही एक पंजाबी मुलगी आहे. ही सुद्धा नेहमी आमच्या सोबत असते... परंतु ही जरा सेन्सीबल मुलगी असल्याने, नीत विचार करून बोलत, वागत असल्याने मी हिचा उल्लेख लेखाच्या प्रमुख पात्रांमध्ये केला नाही..

मुक्तीला घर घ्यायचे असल्याने हा विषय सुरू होता... वास्तविक पाहता मुक्ती आणि मंजुलिका सध्या रूममेट आहेत... पण मुक्तीचे लग्न ठरले आहे... आणि तिला आणि तिच्या होणाय्रा नवय्राला घर घ्यायचे आहे....

नेहमीप्रमाणे... ईशा बाई आपली अक्कल पाजळत होत्या.... एकदम बडा घर लेना.... स्पेशियस होना चाहिये... और ऑफिस के पास लेना... वाकड मे कितने सारे प्रोजेक्टस चल रहे है... वही देखना...

मुक्ती : मैने वाकड मे एक पेंट हाऊस देखा है... सिक्स्टी लॅक्स बोल रहे है... २ बी एच के है...

ईशाः वॉव.... पेंट हाऊस.... वो ही लेना तुम.... ऑफिस पास भी पडेगा...

मुक्ती : अरे अभी पडेगा.... मै थोडेही इसी कंपनी मे जिंदगी बिताने वाली हूं.... और मुझे पास  हो जायेगा लेकीन मेरे हसबंड का क्या??? क्या गॅरेंटी है के उसे हिंजेवाडी मे ही जॉब मिलेगी...

मी :  मतलब...? वो यहां नही है?

मुक्ती : नही अभी वो पुने मे जॉब ढूंड राहा है.... बेंगलोर मे है.

मी ( मनात : अवघड आहे.... हिने पुण्यात नोकरी पकडली म्हणून हिचा नवरा पुण्यात नोकरी शोधतोय.... असो पण हा त्यांचा पर्सनल विषय आहे. आणि ही दुसरी म्हणतेय वाकड मध्येच घर बघ.... आयुष्यभर हिंजेवाडीतच नोकरी करणार आहे का?? निदान मुक्तीने तरी हा विचार केला आहे... नाहीतर अर्धवट माहीतीवर मिसगाईड करायला लोक बसलेलेच आहेत इथे.)

ईशा : तेपण आहेच... आपल्याला कुठे ह्या कंपनीतून रिटायर व्हायचय... ही ही ही ही

मी (मनात - वा वा काय पण.... अत्ता म्हणत होती कायम ऑफिस जवळ पडेल... आणि आता पहा.... कसे शब्द बदलते आहे)

मी : तुम फ्लॅट क्यो नही देख रही हो?

ईशा : ईतना अच्छा पेंट हाऊस मिल राहा है... फ्लॅट क्यो देखेगी...

मुक्ती : नही मै भी सोच रही हू.... ६० मे मुझे २ बी एच के मिल राहा है... उस से अच्छा ४५-५० तक ३ बी एच के फ्लॅट आ जायेगा... वो भी बाणेर या पाषाण के पास हाय वे पे देखू तो अगर बाद मे कही जॉब भी बदल ली तो भी बहोत दूर नही होगा ना...

मी : आय वॉंटेड टू टेल यू दॅट ओन्ली... आणि मी ईशा कडे पाहीले...

ईशा : हा.... तुमको बडा घर मिल जायेगा.... और सिटी के पास भी होगा.... तुम फ्लॅट ही देखना....

आता मात्र हे ऐकून मी फ्लॅट....    

आधीच्या भागाच्या प्रतिक्रिये मध्ये कुणीतरी म्हंटले आहे तश्याच ह्या बाकीच्या तिघी कुपमंडूक आहेत.... वर स्वतःचे डोके नाही... ऑफिसात मात्र स्वतःला १०- १२ वर्षाचा अनुभव असल्याने मॅनेजर बनलेल्या ह्या मुलींचे पुढे कसे होणार हा मात्र मोठा प्रश्न आहे....