भ्रष्टाचार

कारण घडल नाशिक शहरांतर्गत रस्ते बांधा वापरा, हि बातमी पेपरात आली ," शहर आयुक्त कोल्हापुर नगरी अभ्यासा साठी रवाना". बांधा , वापरा आणि हस्तांतरीत करा. ह्यात शहरात प्रवेश करायला शहरा बाहेरिल वाहनांन कडून पथ कर आकारणे . बस्स! झाल सगळ्यांनी आपली चंची सोडली आणि मग काय विचारता अशी गरमा गरम चर्चा झाली.  एवढा पैसा गोळा होतो कुठे टाकतात हा पैसा. तुम्ही गटारांसाठी चांगले रस्ते खोदून पाईप लाईन टाकता त्या वेळेस फक्त त्या कामातील दलालीच दिसते काय? नंतर पुन्हा रस्ते करण्यासाठी काही नियोजन नाही का? . बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा ह्याच तत्त्वावर राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले मग गेली ६०-६२ वर्ष काय गुळ खात बसला होता का?, देशसेवेच्या नावाखाली!. आंम्ही नवीन वाहन खरेदी केल्यानंतरचा आकारलेला पथ कर कोणाच्या घश्यात गेला मग?. लोकसंख्या वाढली तशीच वाहन पण वाढली की , मग तो वाढिव पथ कर काय पांढरे हत्ती पोसण्यात घातला की  आणखीन काही केल कधी समाजाने ह्याचे शांत चित्ताने परीक्षण केले कि नुसते आपापसात कुत्र्यांसारखे भांडत बसलो. आंम्ही जगात महासत्ता बनण्याची स्वप्ने काय म्हणून पाहतोय? जिथे सामान्य दळण वळणासारख्या सुविधा जर रोज विकत घ्याव्या लागत असतील तर मग बाकिच्या बाबतीत काय बोंबामारत बसणार?. खेड्याच सोडा अजून शहरी भागात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत असावे लागत असेल तर हा राज्यकर्त्यांचा नाकरते पणा नाही का?. लोकशाही हवी होतीना आपल्याला कुठे आहे लोकशाही हि तर भोक शाही असल्यासारखी वाटते. ह्याचा जाब कोण विचारणार सगळे नालायक झारीतिल शुक्राचार्यच जिथे पाहिजे तिथे आणि जेंव्हा पाहिजे तेंव्हा आपल्या ताटात वाढून घेणारे. सामान्य आहेच पालख्या तोलायला. काय प्रगती केली आपण आंम्ही चांद्रायन मोहिम आखली पण आजही आपल्या देशातील शेकडा ६०% ते ७०% लोकांना जर चंद्रात भाकरी दिसत असेल तर हे कोणाचे अपयश चंद्राच की देशाच?. १९४८ पासून भ्रष्टाचार आपल्या देशात असा घुसला की पुर्ण समाज हळू हळू नागवा करून टाकला.

                     मग मधल्या काळात आपण देशासाठी पैसा ऊभा केला नाही का? ह्याचा अर्थ आपण सर्वच कर बुडवे वा सामाजिक चोर आहोत का? विचार करा. आपण आपले काम तर चोख बजावत आलो पण, मग एवढा पैसा कुठे गेला?, कधी विचार येत नाही मनात काय झाल असेल एवढ्या पैस्याचे?. अहो ह्याची आकडेअवारी जरी ढोबळ मानाने जरी नजरेखालून घालून बघितली तर अंगावरचे घातलेले कपडे सुद्धा उभ्या उभ्या पेट घेतील आणि आपण तर एखाद्या हिमनगासारखे आहोत. विचार करा प्रादेशिक परिवहन खात्याचे, पोलिस दलाचे. एखाद्या इच्छित स्थळी हवालदारास जर नियुक्ती हवी असेल तर ५०,००० ते ६०,००० मोजावे लागतात. त्यांना विचारून बघा जर जवळचे कोणी असेल तर अगदी बेदरकारपणे सांगतिल अहो हे थेट वर पर्यंत दिल्लित जातात आंम्ही एकटे थोडेच आहोत? . बरोबर आहे ह्याची एक नवीन जातच आहे आणि ह्यांच एकमेकांशी ईतक छान जमलेल असत की मारल्या सारख करतो तु रडल्या सारख करायच , काम झाल की लोण्याचा गोळा आहेच अर्धा अर्धा, उपाशी मात्र आहेत चंद्रात भाकरी पाहत.

                   जो माणुस काल पर्यंत साधा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होता अशी काय जादू होते की ५ वर्षात हाच माणुस निवडून आला की त्याच राहणिमान कमालीच बदलून जात . चकचकीत गाडी, मोठा बंगला , जमीन जुमला सगळ सगळ ह्याच्या भाग्यावर जमा होत . आंम्ही आमच्या डोळ्यानी त्याला कष्ट करतांना खरच पाहतो काहो? . एकदम गर्भश्रीमंत !  कशी काय जादू होते बुवा . ३०ते ४० वर्ष आयुष्य घासून सामान्य माणुस एखादा 1 BHK ची सदनिका स्वताःच भविष्य पणाला लावून करतो आणि आयुष्य कृत कृत्य झाल्यात समाधान मानतो आणि ईथे तर निनावी संपत्ती कीती हे हि माहित नसत . आणि आम्ही आमच काय? कोणाला चिंता आहे आमची ह्या देशाचे हात आहोत आपण फक्त कष्टकरणारे खोट्या अभिमानासाठी आपआपसात लढणारे . थोरामोठ्यांच्या नावाखाली ह्यांनी दुकान मांडायची आणि आंम्ही भावनिक ग्राहक . पैसा खावा तस तारुण्य पण खातात जाऊ द्या तो एक मोठा विषय आहे. एवढ सगळ होत असतांना आंम्ही फक्त साक्षिदाराच्या भुमिकेत कधी क्रीयाशिलता जागरुक होईल आमची . आमच्या घराच्या उंबऱ्यावर शेजारील देशाच्या लोकांनी विष्टा केल्यावर .

                 ह्यात आपल्या सर्वांचा एकच सुर आंम्ही काय करू शकतो? आमच्या एकट्याने काय होणार ? , असा विचार करत जर बसाल तर काहिच होणार नाहि. अस हात पाय गाळून आपल्या पुर्वजांनी हे जे स्वातंत्र्य आपल्या झोळीत टाकल ते काय भिक मागून टाकलेल आहे अस वाटत का? त्यांच्याही काळात ह्याही पेक्षा मोठ मोठे प्रश्न त्यांना पडत असतील पण मी काय करू शकतो असे रडत बसले नाही ते. त्यांच्याच औलादी आपण आपल्या नसानसातून त्यांचच रक्त खेळत आहे आणि खात्री बाळगा ते थंड निश्चितच नाहि. त्यांनी उत्तरे शोधली आता आपली वेळ आहे तेंव्हा...........................?

प्रतीक्रिया अपेक्षित!