देह त्यागल्यावर

स्वावलंबनाचा मी सतत अंगिकार केला
आता मात्र मला
चार जणांनी आधार दिला

स्त्रीधनच आले कामाला
सर्वांच्या शिक्षणाला
ओरबाडून दागिने माझे
मोती जिभेवर ठेवला

तोंडातील घास ज्यांनी
ओढून घेतला
अंगावर आता त्यांनी
डोंगर भाताचा रचला

एकनिष्ठ चपलेप्रमाणे, पायातल्या
झिजवले आयुष्याला
मी स्त्री म्हणून मला
अग्नी पायाकडून दिला

नाही घरात घेतले कधीच कोणी
तुळशीला, मला आणि माझ्या अस्थिला
दिवा मात्र अखेरचा
घरात घेतला
अन कोपऱ्यात ठेवला

**कोणाच्या भावनांना त्रास होत असेल तर
कृपया प्रकाशित करू नये.