आशेचा कोंब

थरकाप नभांचा
निराश नाच वीजांचा

काळे फितुर शत्रू
ताबा घेती गगनाचा
 
वाऱ्याची वाताहत
 ताऱ्यांचे गपकन मिटणे

बेधुंद पाऊस विझवे
कंठशोष धरतीचा

राड माती,
थंड अश्रू
आणि
हळुच डोकावणारा
तो आशेचा कोंब.