बेंच (भाग २)

भाग १ वरून पुढे...

"हॅलो स्नेहा, कशी आहेस तू? मी अमेरिकेत येऊन ७ महिने झाले, मी खूपं वाट पाहिली तुझ्या फोन ची पण तुझ्याकडून काहीच कळले नाही... आय मीन.. खराच कसली आहेस गं तू  ! बोलावलं असतंसं लग्नाला तर काय आलो नसतो लगेच मी...!" -- राहुल उदास होत म्हणाला, एअर पोर्ट वर बाय करायला स्नेहा आली नव्हती तिने फक्त फोन केला होता, त्यानंतर थेट आज... !

"अरे हो..,तुझा नवीन नंबर मी घेतला होता काका काकूंकडून पण त्यांनी सांगितलं की तू लवकर येणार आहेस म्हणून ?

"तो वेगळा विषय आहे,.. मी काहीतरी वेगळं बोलतोय... "

"अरे असं कसं वेगळा विषय ? -- तुला बोलावल्याशिवाय कस करीन मी लग्न ? म्हटलं, तू तसाही वर्षभरात परत येणारेस असं काका काकू म्हणाले.. "

" हो ना अगं, आता अख्खा प्रोजेक्ट चेंज केला माझा, ज्या प्रोजेक्ट साठी आलो होतो तो सोडून वेगळाच प्रोजेक्ट इथे दिला ऑनसाईट मॅनेजर नी, आणि हा प्रोजेक्ट यू. के. बेस आहे, पण माझा व्हिसा प्रॉब्लेम आहे सो परत भारतात येऊन मग २ वर्ष लंडनला जावं लागणार आहे  ... एक्झॅक्टली व्हाट आय वॉज लुकिंग फॉर... आय एम सो हॅपी  !! "

"गुड.. भारीच एकदम, ईव्हन आय एम इक्वली हॅपी फॉर यू... "

"तुझ्या लग्नाचं >?"

अरे सांगितलं ना तुला बोलावल्याशिवाय कसं करेन ?... तुझ्याशिवाय लग्न लागणं शक्य आहे का ?

म्हणजे ? -- परवा प्रसाद शी बोलत होतो कंपनीत, तो पण असच काहीतरी बरळत होता, सरप्राइज काय,मला डबल प्रमोशन चा चान्स काय..! तिकडे नक्की करताय काय तुम्ही लोक ?

-- "मी विशाल शी लग्न नाही केलं,! "

-- काय ? स्नेहा... काय बोलतीयेस तू ? "

खरं तेच, अरे साखरपुडा झाल्यावर आठवड्याभरातच त्याने मला सांगितले की त्याचे त्याच्या मैत्रिणीवर प्रेम होते, पण नाईलाजास्तव त्याला हे सगळं ऍरेंज केलेलं पार पाडाव लागलं.. त्याचे अजूनही प्रेम आहे तिच्यावर, आणि हे सगळं साखरपुड्याआधीच सांगणार होता.. पण त्याला जमलं नाही, आणि मग मीच घरी सांगून टाकलं... सगळ्या गोष्टी घरच्या  घरीच असल्याने जास्त प्रॉब्लेम आला नाही, हो पण आई-बाबा नाराज झालेत, आणि आमची  फॅमिली फ्रेंडशिप जरा ताणली गेली आहे.. असो... "

"काय सांगतेस? पण असं कस... ? म्हणजे आपल्याप्रमाणेच.. पण ..आय मीन... एवढ्या वेळ तो विशाल काय झोपला होता का गं ? त्याला तू काहीतरी बोलायचंस ना..

"लग्ना आधी सांगितलं हे काय कमी आहे राहुल ? नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नाही... जेव्हा हिंमत होईत तेव्हा बोलून टाकावे... मी त्याला संपूर्ण दोष देत नाही, सर्वांची मनं आपल्याएवढी समजूतदार किंवा त्यागी नसतात ना...त्याची चूक आहेच थोडी पण त्याने घोडचूक करण्यापासून स्वतःला आणि मलाही वाचवले.. !"

.. मग आता ?

आता काय ? लग्न होईलच कधी ना कधी... शोध मोहीम चालू आहे... २ स्वप्नांपैकी १ पूर्णं झालं, माझे ग्रुप लीडर चे प्रमोशन, आता लग्न पेंडिंग...

.. वाईट वाटणार नसेल तर एक विचारू ?... मी गेले काही दिवस फोन करणार होतो तुला शेवटचे विचारणार होतो लग्नासाठी पण त्या दिवशी तू पेढा दिलास तो क्षण आठवत होता, त्यात तुझा साखरपुडा.. म्हटलं उगीच माझ्यामुळे पुन्हा गडबड/मनस्ताप नको.. आत्ता तू हे सांगितलंस म्हणून...

विचार...

माझ्याशी लग्न करशील ? माझं अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे...

मला माहीत आहे, म्हणून तर मी काही बोलले नाही तू येण्याची वाट पाहतीये..विशाल ला नाही म्हणताना एकच विचार मनात होता, तुझा....जास्त बोलत नाही.. एवढंच सांगते की आय एम ऑल्सो वेटिंग फॉर यू.. !

खरंच, ? स्नेहा... रिअली... ? प्लीज एकदा सांग मला.. आत्ता इथे व्हिडिओ कॉल वरून प्रपोज करू शकणार नाहीये पण मी गुडघ्यावर बसून फोन हातात धरला आहे.. अगदी इंग्रजी पिक्चर मध्ये हिरो प्रपोज करतो त्या स्टाइल नि (सध्या तर कपडे पण तसेच आहेत, ऑनसाईट वाले.. ) स्नेहा... बोल ना.. इथल्या गार हवेत एकटे फिरून मी थोडासा आजारी पण पडलोय, मला ह्या वेळी डॉ. कडे नेशील ?

.. येस आय विल.. राहुल...!

===!

" वेलकम बॅक राहुल ... " ! बोर्ड हातात घेऊन स्नेहा उभी होती, सोबत राहुल चे आई बाबा आणि कंपनीतले काही मित्र.. ! राहुले ने एअरपोर्ट वरून बाहेर येताक्षणी स्नेहाला पाहिले, आणि सर्वात आधी तिला मिठी मारली.. पण पुढच्या क्षणी अचानक सामाजिक परिस्थितीची जाणीव होऊन लगेच त्याने मिठी सोडवत आई-बाबांना नमस्कार केला, आणि मग आलेल्या मित्रांच्या गोटात देखिल जोरदार टाळ्या दिल्या... !

आज राहुल १३ महिन्यांनी भारतात परत आला... करिअर, प्रेम आणि जबाबदारी ह्यावर कसरत करत काढलेले १३ महीने, स्नेहाचे पारदर्शी आणि सच्चे मनोगत, त्यातच स्नेहा आणि त्याच्यातल्या जुन्या गप्पांच्या आठवणी...ऑनसाईट चा चान्स, कमावलेले/वाचवलेले पैसे,ज्या पद्धतीने ठरवले होते तसे सगळे घडून आले होते... आणि त्यात अति आनंदाच्या ह्या क्षणी स्नेहा चा होकार..!

समजा रामदासांनी आज विचारले असते की "जगी सर्वसुखी असा कोण आहे ? " तर त्याच एअर पोर्ट बाहेरच्या वेटिंग बेंच वर उभा राहुन आपले हात आकाशाकडे पसरवत राहुल नक्कीच मोठ्यांदा ओरडला असता.."मी... ह्या क्षणाला तरी मीच आहे!!"