हो.. !

"किती वाट पाहायची रे? नेहमीचंच झालंय तुझं आता...  मी मूर्ख म्हणून वाट पाहते ना.. " -- नेहा वैतागून म्हणाली,

यश ला हे सगळं एक्स्पेक्टेड होतंच.. कारण मागच्या २ वेळा त्याला असाच उशीर झाला होता, एकदा घरी पाहुणे आले अचानक आणि दुसऱ्यांदा तर घरच्या चौकातला रस्ताच खोदून ठेवलेला होता...  गाडी ला किक मारता मारता... तो तिचा राग कसा काढावा ह्या विचारात, बरं फोन करायची सोय नाही कारण पुजा चा मोबाईल बंद होता, लँडलाईन वर करायचा तर ती घरातून निघाली असणार... काय करावं हा विचार करतानाच पावसाचे २ थेंब यश च्या हातावर पडले...   वर पाहिलं तर आकाश पूर्णं काळे झाले होते.. कधी कोसळेल पाऊस ते सांगता येणं कठीण होत... फायनली १/२ तासाने गाडी चालू झाली, मनोमन पावसाला थोडावेळ थांबवत आणि चालू झालेल्या सुझुकी चे आभार मानत त्याने ऍक्सलेटर पिळला...   आणि ५-१० मिनिटातच समोरच्या गाड्या चुकवत, मागे टाकत, सिग्नल ला सगळ्यात आधी क्रॉस करत तो हातात कॅडबरी.. डोळ्यात प्लीज आणि ओठावर सॉरी घेऊन तिला भेटायला पोचला.

"नेहमी काय गं?  खरंच आज गाडीच चालू होत नव्हती.. आत्ता १/२ तास किक मारून आलोय... प्लीज चिडू नकोस... & हो, नुसतं सॉरी नाही... ही घे कॅडबरी...  प्लीज स्माईल नाउ..! "

- "वा छान.. कॅडबरी दिली की झालं.. तुला माहीतिये ना मी काही जास्त वेळ रागावू शकत नाही तुझ्यावर... तुझं गोड गोड बोलणं आणि उशीरा येणं... वरून.... " एवढं बोलून ती मागे बसेपर्यंत एक जोरदार वीज कडाडली आणि ते बोलणं अर्धवट टाकून नेहा ने यश च्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली "ओ गॉड... आज खूप पाऊस येणार असं दिसतंय.... यश मी रेनकोट पण नाही घेतलाय... "!

"मग भिजू की त्यात काय.. " -- यश ने गाडीला एक हलकेच वळण घेऊन गिरकी घेतली आणि आरसा नेहा च्या चेहऱ्याचा अँगल ला सेट करून म्हणाला.

"म्हणे भिजू की, मि. यश आपण विसरत आहात की रिमझिम पाऊस नसणारे हा... वर पाहा एकदा म्हणजे कळेल, त्यात तुमची प्रपोज करण्याची बोर पद्धत, म्हणे ३. ३० वाजता तयार राहा... मी तुला आज प्रपोज करणार आहे... -- किमान १० वेळा झालं हे, प्रपोज करत नाहीस... काइ नाहीस..  !! "

"अगं, वेगळं काय करतो असं प्रपोज म्हणजे? तुला काय अगदी हॉलिवूड स्टाइल पूल साईट टेबल वर, ब्लॅक अरमानी सुट मध्ये दातात गुलाबाच फुल घेऊन, शेजारी सेक्सोफोन/पियानो वाजवणाऱ्यांची टीम आणि कँडल लाइट डिनर मध्येच प्रपोज केलं पाहिजे का, की मला तू आवडतेस आणि माझ्याशी लग्न कर...  आणि अजून असा कितीही रोमँटिक प्लॅन केला ना तरी तू म्हणशील... हे काय फिल्मी प्रेम! एवढं काही करायची गरज नव्हती!  " -- यश ने असे सगळे एका दमात सांगितले, आणि रिमझिम पाऊस सुरू झाला...

-- " हीही... सगळं तूच बोल..! " - नेहा नि केस मोकळे केले.. नेहमी गॉगल,  स्कार्फ बांधून मागे बसणारी नेहा रिमझिम पावसात एवढी सुंदर दिसते हे यश ला देखिल नवीन होतं...

" तो आरसा निट कर.. मागे पाहायला असतो तो -- "

मागेच पाहतोय की मग, त्याच आरशात नेहा ला डोळा मारून यश म्हणाला...!  

"मागे म्हणजे मागची लोक, बाकीच्या गाड्या... मागून येणारे आणि मागे टाकलेले संभाव्य धोके.. पिलियन वरचा माणून पाहायचा नाही त्यात... "

"अग आता तुला मागे बसवलं ह्यांतच आलं की सगळं.. तुला मागे बसवायचा सर्वोच्य धोका पार केला आहे मी.. मग बाकीचे धोके काय मोठंसं....! "

"तू पण ना यश... मस्करी नेहमी..., आणि बाय द वे, आपण चाललोय कुठे?  ६-७ किलोमीटर नुसते फिरतोय.. "

" गेस्स... "

"ओह.. नो... आर यु किडिंग... आर वी हेडिंग टू लोनावळा? - हायवे च्या आजू बाजूला पाहत नेहा जवळ जवळ ओरडलीच कारण तोपर्यंत पाऊस चांगल्यापैकी चालू झाला होता... केस/कपडे भिजले होते.. आणि ह्यात लोनावळा म्हणजे...!

" येस... मस्त राउंड मारून येऊ १००-१५० किलोमीटर..

"शहाण्या मी घरी सांगितलं नाहीये काहीच... म्हणालिये जाऊन येते फक्त.. उशीर होईल रे.. :("

"सांग की मग एखाद्या मैत्रिणीचं नाव, तिचा वाढदिवस कर आजचा दिवस.. लवकर येऊ आपण..  "

"हम्म्म.... तुझ्यामुळे किती खोटं बोलाव लागत... "

चिंब पावसात भिजून नेहा आणि यश बराच वेळ तसेच फिरत होते.. एका मस्त मोठ्या वळणावर जेव्हा टर्न घेत होता तेव्हा नेहा नि घाबरून यश ला जवळजवळ मिठीच मारली.. आणी ओरडत म्हणाली, असा चालवणार असशील तर मागे बसणं मुष्किल होईल...  यश म्हणाला अशीच जर बसणार असशील मागे तर टर्नच घेणार नाही मी.. ही ही ही...!

अश्याच गप्पा मारत मारत बराच वेळ हिंडून ते परत पुण्यात आले... परत आले तर इथे पावसाचा टिपूस नाही,  ७ वाजले होते पण, ओलेत्यानं घरी जायचं तर १० प्रश्न विचारले जातील... काय टाकीत अंघोळ केली का? एवढा पाऊस नक्कीच पडला नव्हता & All...!

मग पुन्हा एकदा CCD मध्ये जाऊन मस्त कॉफी ऑर्डर केली... तिथे कॉफी च्या कप वर हार्ट शेप फोम/चॉकलेट डिझाइन मध्ये स्ट्रॉ घालून यश ने तिच कॉफी नेहापुढे केली... "स्वीटहार्ट, धिस इस नॉट जस्ट कॉफी, इट रीप्रेसेंटस माय हार्ट.. सो प्युअर & डेडिकेटेड... "

नेहा त्याच्या हातात हात घेऊन म्हणाली - " खरंच तुला प्रपोज करता येत नाही बेबी... बट आय अंडरस्टॅंड...  & दॅटस व्हाय आय लाइक यू सो मच...! यू आर सच अ स्वीटहार्ट...  "

८:३० चा अलार्म वाजला आणि यश ने ओळखले, की ही नेहा ला घरी सोडायची तिसरी घंटा वाजली..; ) झटक्यात त्याने बिल ठेवले, आणि बाइक वरून तिला घराखाली सोडून म्हणाला... "बघ... ऑल इन टाइम... आणि कपडे पण वाळले... उद्या परत जाऊया? "

"ए..  जा आता इटस बीट लेट आणि मला ही जाऊदे..  गुड नाइट... "

"आय... हाय... आज तर झोपच नाही येणार... बिलिव्ह मी...  टुडे इस & विल बी द  "

"जा यश... स्वीट ड्रीम्स... बाय...   " यश ला ढकलून ती गेट मध्ये तो दिसेनासा होईपर्यंत उभी होती...

बेड वर पडल्या पडल्या यश ने एकच मेसेज पाठवला " नेहा तुझ्या डोळ्यात स्वतःला लांब जाताना मला पाहता येत नाही गं.. इथून पुढे फक्त एकदाच बाय म्हणून लगेच पाठमोरी होत जा... आय रिअली लव्ह यू... डू यू?  ! "

नेहा च्या रिप्लाय मध्ये होता फक्त "हो"... आणि एक स्माइली, विश्वासाने स्मितहास्य देणारा...!