वय ओळखा !!!

माझा एक गणिती मित्र आहे, भास्कर. बऱ्याच वर्षांनी तो अचानक भेटला आणि सरळ त्याला घरी घेऊन आलो. बसताक्षणी त्याची नजर एका फोटोकडे गेली.

"या तुझ्या मुली? "

"हो"

"तिघी? "

"हो, का रे ? "

"काय वय आहे त्यांचं? "

"हम्म" आता मला त्याची परीक्षा घ्यावीशी वाटली.

"या तिघींच्या वयाची बेरीज १३ आहे. "

"यावरून कसं काढता येईल?"

"बरं. त्यांच्या वयांचा गुणाकार माझ्या घर क्रमांकाइतका आहे. "

"नाही जमणार, आणखी थोडी माहिती हवी"

"हम्म... मागच्याच महिन्यात माझ्या मोठ्या मुलीचा......... "  वाढदिवस झाला हे माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने फटकन उत्तर दिलं.

बघा जमतंय का तुम्हाला ?

@ प्रशासक :- यावरील प्रतिसाद काही दिवस झाकून ठेवावे. धन्यवाद.