मराठ्यांचा इतिहास ?

 डिसेंबर १२९३ ला, ५०० मैलांवरुन आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने ८००० स्वारांनिशी देवगिरीवर हल्ला केला, त्यावेळी शंकरदेव यादव (राजपुत्र आणि सेनापती) खूप सारं सैन्य घेऊन दूर कुठेतरी गेला होता. देवगिरीवर असलेल्या ४००० स्वारांसोबत राजा रामदेवरायाने प्रतिकार केला पण तो तोकडा पडला. त्याने शेवटी तह केला.

पण हि बातमी कळताच शंकरदेव यादव परत आला तो मोठी फौज घेऊन देवगिरीच्या रक्षणासाठी आला. पण एका अफवा पसरली. दिल्लीहून फार मोठी येणार आहे. या अफवेने घाबरून राजा रामदेवराय शंकरदेवाच्या मदतीला आलाच नाही. शंकरदेवाने खिलजीच्या सैन्याला चांगलेच झोडपून काढले, पण त्याच वेळी देवगिरी किल्ल्याच्या मागे असलेली १००० स्वारांची फौज खिलजीच्या मदतीला आली. त्यांच्या घोडांच्या टापांनी इतकी धूळ उडवली की फारसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे सैन्याला वाटलं की दिल्लीहून येणारी अफाट फौज म्हणजे हिच ती. आणि यादव सेना घाबरून पळायला लागली. ६ फेब्रु. १२९४...

खंडणी दिली गेली... किती ? ६०० मण सोनं, ७०० मण मोती, २ मण हिरे-माणकं आणि १००० मण चांदी, ..... आणि रामदेवरायाची मुलगी....  (संदर्भ :- बाबासाहेब पुरंदरे.... )

मराठी सेना हरली ती कशामुळे ? केवळ एका अफवेमुळे, की रामदेवरायाच्या अनाठायी भीतीने? की आक्रमणाला सज्जच नसलेल्या रामदेवरायाच्या अदूरदर्शीपणामुळे ? की मराठी माणसं त्यावेळच्या संतांनी दाखवलेल्या भक्ती-मार्गाला लागल्यामुळे ?

तेव्हापासून जो दिल्लीचा दरारा बसला, तो छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे वगळता तो आजतागायत कायम आहे, हे आपलं दुर्दैव का आपल्या कर्माची फळं.....

ह्या आक्रमणापूर्वी असलेल्या संपन्न महाराष्ट्राचा इतिहास अगदीच थोडक्यात शिकवला जातो.... आता तर "कोथळा"ही पुस्तकातून काढून टाकलाय. मराठी माणूस पेंढा भरून ठेवलेला वाघ झालाय का ?

का म्हणून आम्हाला आमचा वैभवशाली इतिहास शिकवला जात नाही ? फक्त देशमुख-देशपांडे आणि त्यांच्या वतनदारी.... आणि थोडक्यात छत्रपतींचा इतिहास... बस्स ? आम्हाला मुळातूनच अस्मितारहित करण्याचे कारस्थान खिलजीपासून आजपर्यंत चालूच आहे का ?

स्वातंत्र्यपूर्व काळातही इतिहास गांधीजी आणि नेहरू यांच्याच भोवती फिरतो. त्यावेळी महाराष्ट्रात कोणी नेतेच नव्हते? इथे स्वातंत्र्यचळवळ झालीच नाही ? मग तिचा इतिहास कुठे गेला ? का आम्ही लाचारच राहावं म्हणून तोही झाकला जातो ?

हत्तीच्या पिल्लाला बांधण्यासाठी जाडजूड दोरखंड बांधले जातात, मात्र मोठ्या हत्तींना साधी साखळीही पुरते, कारण त्याची प्रतिकार करण्याची इच्छाच मरून गेली असते.... असाच मराठी माणूस झालाय का ?

ज्या छत्रपतींनी शाहिस्तेखानाची (ज्याची फौज १ लाख होती) बोटे छाटली, त्यांच्याविषयी भलतंसलतं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकावर भारतात बंदी घलू शकत नाही.... त्याची बोटे धजलिच कशी असं काही लिहायला.... का आम्हीच सुर्याजीचे वंशज निर्माण करून स्वतःलाच मातीत घालतोय ...... कशासाठी ... कशासाठी ?