स्वप्न कां भंगावे असे?

हंसणे माझे
रुसणे हिचे
समजूत घालावी कुणी?

दर्शन माझे
हरकणे तिचे
काय समजावे कुणी?

गजरा हातात माझ्या
शंकाकुल होणे हिचे
उत्तर शोधावे कुणी?

फूल हातात माझ्या
गंधात रंगणे तिचे
मेळ घालावा कसा?

प्रेमातुर मी
फुरंगटणे हिचे
कढ सोसावा किती?

कल्पनेत धुंद ती
क्षणसंग इच्छिणे तिचे
..........
स्वप्न कां भंगावे असे?