बहर जुईचे..

न-सांगताच सारे कळून गेले
माझेच डोळे गद्दार निघाले

करायचे नव्हते ते करून गेलो
मन माझे चंचल निघाले

होते विसरायचे मला जे
हृदयावर तेच कोरलेले निघाले

सस्मित नजरेने निरोप घेतले
हास्य माझे क्षणभंगुर निघाले

ज्योतीला प्रेमाची काय कदर
जळणारे पतंग हजारो निघाले

भेटीत कोणी ना बोलले
मौन तिचे बोलके निघाले

फुलतात बहर 'हेमंतात' कोठे?
बहरलेले वेल 'जुईचे' निघाले