चुरमा लाडू

  • २ कप गव्हाचे पिठ
  • १/४ कप रवा
  • २ कप साजुक तुप
  • १ कप पीठी साखर
  • १/२ कप पाणी
  • १/२ कप दुध
  • काजु बदाम पिस्ते काप आवडीप्रमाणे
  • १ चमचा वेलची पुड
  • १/३ कप भाजुन कुटलेली खसखस
  • चिमुट भर मीठ
४५ मिनिटे
  1. गव्हाचे पीठ, रवा आणि २ टे. स्पून तूप व मिठ मिक्स करून त्यात दूध आणि पाणी घालून छान कणीक मळून घ्या.
  2. त्याचे छोटे बॉल्स करून ते बोटाने दाबून मुटके करून घ्या.

३. आता हे मुटके तुपावर मंद जाळावर खरपूस तळून घ्या.

४. मुटके गारसर करून नंतर मिक्सर मधून किंवा फूड प्रोसेसर मधून दळून घ्या. छान चुरमा (पावडर) करून घ्या.

५. मुटके तळून उरलेल्या तुपात बदामाचे, काजूचे, पिस्त्याचे काप जरा तळून त्यावर हा चुरमा टाकून पाचच मिनिटे मंद जाळावर परता.
६. गॅस बंद करून यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस घालून हलवा. मिश्रण जरासं गारसर झाल्यावर. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळा.

मस्त लाडू तैय्यार...... :)

  • आवश्यकते नुसार तुम्ही तूप जास्त वापरू शकता.
  • निम्मा गूळ निम्मी साखर वापरून हे लाडू बनवले तरी चालते. सुरेख चव येते.
  • मेवे आवडी प्रमाणे कुठलेही वापरू शकता.
  • राजस्थान, गुजरात मध्ये हे लाडू करतात.
  • कालच गणपतिच्या प्रसादाला मी हे लाडू केले. फोटो काढून स्टेप बाय स्टेप इकडे पेश केले आहेत. आता फोटो वापरायची हि अक्कल आली .   हुरेरे!!!
अनुपमा