आयुष्याचे ओझे वाहुन झुकलो थोडे
जीवन जगता शतदा मेलो जगलो थोडे
देवाचा मी दासच होतो भांडण नव्हते
हार तरी का? प्रश्न करूनी थकलो थोडे
घडणे जे जे तेच घडे तर का न म्हणावे?
सत्कर्माची ऍसी तॅसी चिडलो थोडे
पक्षी सारे सोडुन गेले नवख्या जगती
वठलेले ते झाड बघूनी रडलो थोडे
श्रीमंतांचे झगमग जीवन म्रगजळ मजला
तिमिरासंगे दोस्ती करण्या विझलो थोडे
बिन बाह्याचा सदरा शिवला क? मज पुसती
अस्तिनच्या सापाशी दोस्ती चकलो थिडे
आनंदाची ओळख नसता दु:ख कशाचे?
विश्वा वरती थुंकुन मी पण हसलो थोडे
थाट कशाचा? चिंधी नव्हती लाज लपवण्या
तिरडीवर नव-वस्त्र मिळाले सजलो थोडे
रखरख सारे ओल न दिसली "निशिकान्ताला"
रिमझिम गजला बरसत आल्या भिजलो थोडे
निशिकांत देशपांडे मो. न. 98907 99023
E MAIL दुवा क्र. १
प्रतिसादाची प्रतिक्षा