कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला
बादल्या भरून भरून यायच्या
सु SSसु SS करीत धूत बसायच्या
तो काळच तसा होता
सासुरवाशिणीचा अड्डा जमायला
तेवढाच निव्वळ क्षण होता ...!
घरच्या सुख दुखाचे रडगाणे गायला
नदीकाठ किती मस्त होता
तो नदीकाठ सुंदर सुरेख होता
अगदी बहरून जायचा
ह्या सुंदर फुलांनी
कशी बांधीव नदी होती
छान पायर्या पायार्या होत्या
पायर्यावर कपडे आपटत बसायच्या
ह्या सासुरवाशिणी ...!!
डबल बी साबणाचा मस्त फेस वाहत राहायचा
बघायला बरे नि बरे वाटायचे
त्याचा गंध आसमंतात फिरायचा
एखादे लवथवते तारुण्य डोळे खेचून घ्यायचे
नागासारखा साबणाचा फेस नदीवर तरंगताना
किती छान वाटायचे ...!!
डोळे त्या पाण्यात हरवून जायचे
त्या थंड थंड हवेत मन विरघळून जायचे
कधी दिवाळीच्या दरम्यान गणिताचा पेपर देऊन
नदीवरच्या सांडव्यावरून जायचो
तेह्वा बायका सू SS सु SS करीत धुणे धूत बसायच्या
माझ्या गणिताच्या पेपरमध्ये सगळा फेस नि फेस असायचा
प्रमेय नि रायडर मला नागासारखा वाटायचा
माझे दुख एवढे मोठे नि ह्या आपल्या सुSS सुSS करीत बसायच्या
गणितापेक्षा ह्यांचे दुख मोठे असेल काहो ?
ह्या मला नेहमी सुखादुखाच्या पार दिसायच्या
कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला
बादल्या भरून भरून
नि सुSS सु SS करीत धूत बसायच्या
माझा गणिताचा पेपर ...!!
नि ह्याचे चुबुक चुबुक धुणे
कसे सोपे असते जगणे ......
नि कसे अवघड होऊन जाते जगणे ..
कुणास ठाऊक काय खरे नि काय खोटे .....????