कर्करोगाला आयुर्वेदात उतारा आहे?

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी आयुर्वेदीय उपचार होणं शक्य आहे का?
मुळात कर्करोगाच्या गाठीला शस्त्र लावले तर तो अधिक उफाळून नाही का येणार? आणि जर त्यावर कोणताही ऍलोपऍथीचा उपचार केला नाही तर त्याचे उरलेले आयुष्य अधिक सुखाने जाते का? असा रुग्ण हळूहळू क्षीण होत जाणे अपेक्षित आहेच, पण त्याला जर इतर कोणताही त्रास होत नसेल तर आणि अशक्तपणा सहन करण्याची मानसिक तयारी असेल तर आहे ती स्थिती तरी टिकवता येते का?
रुग्णाचे वय ७३ वर्षे आहे आणि शस्त्रक्रिया करून काहीही उपयोग होणार नाही असे सांगितले आहे.
ऍलोपथीच्या उपचाराने शरीराचा भार वाहत मृत्यूची वाट बघण्यापलीकडे काहीही होत नाही. माझ्या म्हणण्याचा आधार- झाड वाढावे म्हणून ते छाटून टाकतात. जितके छाटावे तितके ते जास्त फोफावते. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. या बाबतीत संशोधन होते आहे का? झाले आहे का? कुणी अशा रुग्णावर उपचार केले आहेत का? कृपया जाणकारांनी प्रतिसाद द्यावा.
याबाबतीत (कर्करोगावरच्या आयुर्वेदीय उपचारपद्धतीबद्दल) योग्य आणि अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आत्यंतिक गरजेचे आहे.
शिवाय, भौतिक पातळीवर कर्करोगाचा सामना करतानाच तो मानसिक पातळीवर, पण गनिमी काव्यानेही करता येऊ शकत असला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे. याबाबतही जाणकारांनी विचार करणे गरजेचे आहे.
आपल्याच शरीराच्या बंडखोर झालेल्या पेशींना मानसिक पातळीवर रुग्णाने शरीरात सामावून घेऊन जास्त मानाने जगण्याची लालूच दाखवली तर ह्या रोगाचा सामना जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. कदाचित माझे म्हणणे वेडेपणाचे वाटेल पण नुसती इच्छाशक्ती असे नाव न देता इतर औषधी उपचारांप्रमाणे याही उपचाराचे पूर्वनियोजन करता येऊ शकते का? विचारवंतांनी यावर अधिक विचार करावा.