माझ्या मधला मीच हरवला

एक अकेला वेड्यासम मी जगतो आहे
माझ्या मधला मीच हरवला, फिरतो आहे

नसता कोठे असण्याचे का स्वप्न बघावे ?
मृगजळ पुढती मागे मागे पळतो आहे

एकाकीपण इतके जगलो , लिलया आता
माझ्या पासुन दूर मला मी बघतो आहे

पाप कबूली देण्या आहे गिरिजाघर पण
हिंमत नाही , मज पसून मी लपतो आहे

एकल येती जन्मा सारे एकल जाती
एकल "जगती " धर्म कधी ना म्हणतो आहे

आत्म्यालाही एकाकीपण मान्य नसावे
एका सोडून दुसऱ्या देही वसतो आहे

हसलो , बेरड जगलो जीवन , थकलो आता
बोजड झाले दुःख , मनोरा झुकतो आहे

एकलपण द्यावे ना कोणा इतके देवा
बेवारस मृत देह तयाचा कुजतो आहे

"निशिकांता"का शुन्य असवा भाव कुणाचा ?
ग्राहक नाही आज मला मी विकतो आहे

निशिकांत देशपांडे    मोंअ.  ९८९०७ ९९०२३
 E Mail:-  nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा