श्रीमद्भगवद्गीता श्लोक संख्या

श्रीमद्भगवद्गीतेतील एकूण श्लोकांची संख्या ७०० समजली जाते. लोकमान्यांच्या गीतारहस्य या ग्रंथानुसार धृतराष्ट्राचा--१ , संजयाचे--४० श्लोक, अर्जुनाचे--८४ श्लोक आणि भगवंतांचे--५७५ श्लोक आहेत. पहिल्या अध्यायात २१ वा आणि २८ व्या श्लोकात पहिली ओळ संजयाची आणि दुसरी ओळ अर्जुनाची आहे. मग ह्या श्लोकांची गणना कशी करावयाची? हे दोन श्लोक आपण न धरता ६९८ श्लोकांचा हिशोब करू.

त्याचा हिशोब पुढील प्रमाणे लागतो. धृतराष्ट्र--१, संजय- -४०, अर्जुन--८३ आणि भगवंत--५७४---एकूण ६९८

यावर कोणी प्रकाश टाकील काय?