गजलेस काय झाले? ओघळ कशास गाली ?
अश्रूं मुळे उतरली गालां वरील लाली
आनंद पेरण्याला गजले मधे जरासा
बी शायरा मिळेना रुजवावया खुशाली
अंधार राज्य करतो हरवून सूर्य गेला
शोधावयास त्याला या पेटवू मशाली
नाका समोर चालुन पदरात काय पडले ?
यश लाभते जयांच्या तिरक्या आहेत चाली
व्हावे भले म्हणूनी सत्संग ठेवला मी
सारे निघून गेले वस्ती विरान झाली
एस्कॉर्ट खास देण्या बाजार खूप मोठे
ज्युली सजून येते येते कधी वृषाली
मधुमेहग्रस्त सासू कडवेच बोल बोले
रक्ता मधील साखर ओठी कधी न आली
घेवून अर्ज माझा चकरा अनेक केल्या
कर्यालयीन शैली बोकाळली दलाली
"निशिकांत" गुणगुणावे पाश्चात्य गीत आता
सोडून गंजलेली सूफी जुनी कवाली
निशिकांत देशपांडे मो.नं.:-- ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा