काव्य-प्रस्ताव : ३

संदर्भ : दुवा क्र. १

खाली दिलेल्या द्विपदीच्या अनुषंगाने - ही  द्विपदी  पूर्णत : / अंशत : , किंवा

त्यातील केवळ कल्पना वापरुनही - आपल्याला सुचेल / रुचेल त्या कुठल्याही

प्रकारातील रचना करून येथेच प्रतिसादाच्या रुपाने द्यावी, अशी  विनंती.

एक-दोन द्विपदी / कडवी सुचल्यासही आपले स्वागत आहे, शुभेच्छा !

आजची  द्विपदी   :

" पुन्हा नव्याने  जुन्याच जागी  तसेच  सारे जमूत, मित्रा -

  कुणी पाहिले, उद्यास कोठे  असूत - किंवा  नसूत मित्रा ! "