जीवन

क्षण गेले भूत झाले
जे नोंदले इतिहासाने
वर्तमानी येण्याची पुन्हा
आंस त्यांना आहे!

क्षण येणारे भविष्यातले
गर्भात वाढणारे
वर्तमानी येण्याची झणी
आंस त्यांना आहे!
क्षण वर्तमानाचा
चंचल अस्थिर सदा
त्याला उदरी ओढण्याची
आंस भूताला आहे!

क्षण क्षण येणारा
लगोलग भूत होणारा
सुंदर त्याला करण्याची
आंस वर्तमानाला आहे!!