इथल्या लेखांचे वर्गीकरण

कुठे शोधिशी...


इतर संकेतस्थळे आणि हे ह्यात एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे, इथे केवळ विषय उपविषय असे वर्गीकरण करून आम्ही थांबलेलो नाही. इथली वर्गीकरणपद्धती अधिक लवचिक आहे. इथे लेखांच्या वर्गीकरणासाठी वेगवेगळी वर्गीकरण सूत्रे एकाच वेळी वापरलेली आहेत. सोपे उदाहरणच घ्यायचे तर 'कलामहाविद्यालयात संगणकाचा प्रभाव' ह्यासंदर्भात एखादा लेख असेल तर तो वाचकास शिक्षण, कला, संगणक तंत्रविज्ञान असे निरनिराळे 'विषय' आणि अनुभव, माहिती, शंका, मदत, सल्ला असे निरनिराळे 'लेखनप्रकार' ह्या दोन्हीतील अनेक उपसदरात एकाच वेळी सापडायला हवा! तशी व्यवस्था एकापेक्षा अधिक वर्गीकरण सूत्रे वापरून करता येते.


सध्या लेखनाचा प्रकार आणि लेखनाचा विषय ह्या दोन सूत्रांनुसार वर्गीकरण करण्याचे ठरवले आहे. पुढे अधिक सूत्रांचा अवलंब करता येईल.


लेखनप्रकार ह्या वर्गीकरण सूत्रात माहिती, समीक्षा, स्वनिर्मिती, अनुभवकथन असे लेखनाचे निरनिराळे प्रकार घेतलेले आहेत. ह्यातही पुढे अधिकाधिक बारकावे आणता येतील. लेखकाची भूमिका त्यातून चटकन समजावी हा त्यामागे आमचा 'हेतू' आहे! एकदा लेखनाचा प्रकार लक्षात आला की संभाषणात, आणि विचारांच्या देवघेवीत नेमकेपणा येण्यास मदत होते असे आम्हास वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर अमुक एक लिखाण हे शंका आहे, की प्रश्न? सल्ला आहे की उत्तर? आक्षेप आहे की सूचना .... वगैरे मुद्दे ह्या वर्गीकरणामुळे जास्त स्पष्ट होतील असे वाटते. ह्यातल्या अनेक प्रकारात उपप्रकार आहेत. उदा सद्भावना ह्याप्रकारात शुभेच्छा आणि अभिनंदन असे दोन उपप्रकार आहेत.


लेखनविषय हे वर्गीकरण सूत्र सगळीकडे पाहायला मिळते. त्यामुळे ते आपणा सर्वांच्या परिचयाचे आहे. उदाहरणार्थ, लेखक राजकारणाबद्दल लिहीत आहे, की सामाजिक सुधारणांविषयी? देशांतराच्या पद्धतीतीतल्या बदलांबद्दल लिहीत आहे, की नाटक , चित्रपटांबद्दल..... असे समजायला आणि नंतर आपल्याला हव्या त्या विषयावरचे लिखाण वाचायला त्यामुळे सोपे जाईल.