शिक्षण व्यवस्था व शिक्षक...............

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था खरं पाहता वाखाणण्यासारखी आहे.शासन यामध्ये सुधारणा व्हावी या साठी नवीनं नवीनं पद्धतींचा समावेश करते आहे .मग त्यात प्रा.रामकृष्ण मोरे  यांनी सुरू केलेलं इयत्त्ता १ ली पासून इंग्लिश विषय आहे.नंतर क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आहे.नव्यानंच सुरू झालेला उपक्रम सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शासन खूप छान योजना राबवत आहे .मात्र या योजना प्रत्यक्ष राबवणारे शिक्षक यांचा आपआपल्या सोयीनुसार अर्थ लावताना दिसत आहेत. शिक्षण या क्षेत्रात काम करताना प्रत्येक शिक्षकाला प्रथम शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर माहीत असायला हवे मात्र बऱ्याचदा याचे उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही.

प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च.माध्य.व पदवी अशा परीक्षा पास झाल्यावर खरंच का कुणाला शिकविता येत? या देशाला खूपं मोठ्या विचारवंतांची परंपरा लाभली आहे. प्रत्येकाने शिक्षणाबाबत आपले विचार मांडलेले आहेत. मा.गांधी म्हणतात की.शिक्षण हि एक चांगली सवय आहे. शिकणे हे माणसाच्या अंगचा उपजत गुणच आहे. गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं की चार भिंतीच्या आत शिकण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात शिकावं.कारण या निसर्गातील प्रत्येक गोष्ट ज्ञानानं भरलेली आहे व ती आपणाला काही ना काही देतच असते. आपल्याला त्या प्रकारची नजर निर्माण करायची आहे. डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी देखील याच प्रकाराचे विचार मांडलेत.आचार्य नरहर कुरुंदकर यांनी आपल्या ‘जागर’ या पुस्तकात त्यांनी प्रगतिवादी आणि आदर्शपणाच्या गप्पा मारणार्‍या आणि वास्तवात तसे न वागणार्‍या शक्तींच्या दिखाऊपणाचा, दंभाचा बुरखा फाडला आहे. आणि आता देखिल समाजामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करावयाची असल्यास त्यासाठी शिक्षकांनीच प्रथमांत शिक्षणाचा अर्थ समजावून घेणे अपेक्षित आहे.

काही काही शाळांचा कारभार पाहिला तर शिक्षकांना शिपायाच्या म्हणण्यानुसार काम करावं लागत आहे.म्हणजे १० वी नापास झालेला इसम ज्याच काम शाळेची साच्याच्यात करणे व बेल वाजविणे किंवा बेल वाजली की साहेबांपुढे उभे राहणे अशी माणसे आज शाळा चालवतायत.हुशार उपक्रमशील शिक्षकांना अशांच्या हातचे खेळणे होऊन काम करावे लागत आहे . यापेक्षा दुसरी शोकांतिका ती काय असावी यामुळे अशा गावातून वा वस्त्यांवर काम करणारे शिक्षक खरंच का प्रामाणिक काम करत असतील ? शंका वाट्ते. कागदावर मात्र सगळे दिसते त्या खरं किती व खोटं किती हे त्या शिक्षकांना व अधिकाऱ्यांनाच माहीत हे सगळे आपआपल्या सोयी पाहताना दिसतात मात्र त्या विद्यार्थ्याचा विचार अजिबात करत नाहीत. गुण मिळवणारा हुशार या संकल्पनेवर सर्वच जण ठाम आहेत.पण गुण पाठांतर करून .घोकंपट्टी करून ,दुसऱ्याची नक्कल करून,परीक्षेच्या वेळी मार्गदर्शक घेऊन,किंवा शिक्षकाच्या संगनमताने कसेही गुण मिळवता येतात यावर बुध्दिमत्त्ता ठरविली जाते .त्या मुळे पुस्तक वाचून दाखवायचे ५० प्रश्न व त्याची उत्तरे द्यायची .त्यातीलच प्रश्नाची प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घ्यायची या प्रकारे शिक्षण चालू आहे. मुलांना वाचावं व मग त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी त्यांना द्याव्यात .आजचा पालक वर्ग १ ली पासून मुलाने १०० टक्के गुण मिळवण्याची अपेक्षा ठेवताना दिसत आहेत.बारकाईनं विचार केला तर या इयत्ते पासून ९ पर्यंतची गुण पत्रक यांचा फायदा काय गुण मिळवण्याच्या या स्पर्धेत आजची मुलं हरवली आहेत याला जबाबदार समाजात शिक्षणाबाबतचे अज्ञान आहे. लहान वयातच जिथं डोळ्यांचा,कानांचा, योग्य रितीने वापर करायचा निसर्ग वाचायचा त्या वया पासून अभ्यास नावाचे भूत आपणच या लहानग्यांच्या मानगुटीवर बसवतो. अभ्यास या शब्दाचा अर्थ तसा व्यापक आहे.

एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे असाच काहीसा. १ ली च्या मुलाला कुठे मुळापर्यंत जायचे आहे की १० वीत शिकणाऱ्या मुलाला असा मुळापर्यंत जाऊन अभ्यास करायचा आहे. १ ली ते १० वी ह्या शिक्षणाच्या पायऱ्या मानल्या तर या मध्ये अभ्यास नसून सराव जास्त महत्त्वच आहे. त्यामुळे मुलांमध्ये सराव हा शब्द प्रचलित व्हावा त्यांच्या कुवती नुसार अभ्यासाची व्यापकता समजावून द्यावी जर एखाद्या मुलाला सांगितले की हा तुला अभ्यास करायचा आहे तर तो कंटाळा करतो पण जर म्हटला की याचा सराव कर हा अभ्यास नाही तर तो जास्त मजेने ते काम करतो .आणि सरावाने माणूस परिपूर्ण होतो असे आपणास माहीतच आहे.

आपणाला दिलेली उद्दिष्टे पाहिली की लक्षात येते की , एक शिक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्याला गुण मिळवण्यासाठी पात्र करावयाचे नसून त्याला सरावाने १० वी नंतर च्या शिक्षण घेताना अभ्यास करायला पात्र बनवायचे आहे.सरावाने तो गुण तर मिळवणारच आहे पण त्या सोबत ज्ञानही मिळवणार आहे.

मग विद्यार्थ्याच्या प्रगती साठी सर्वकाही अंतिम ध्येय नोकरी प्रमाणपत्रांच्या आधारे ज्ञानावर आधारित नाही.अशी अवस्था आज राहिलेली नाही .या विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र असणार आहे .मात्र ज्ञान नसल्याने शिकूनही उपाशी मरावे लागेल.

या साठी शासनाने राबविलेला प्रत्येक विचार हा या शिक्षकांपर्यंत पोहोचावा तोही योग्य प्रकारे प्रशिक्षण होतात ती यांना शासन काहीही आपल्यावर लादत आहे असे वाटते त्यामुळे ते त्यांना नकोसेच. क्षमताधिष्ठित याचा अर्थ चुकीचाच लावला गेला ,मुलांच्या अंगच्या क्षमता वाचायच्या व मार्गदर्शन करायचे त्या क्षमता कशा वाढवता येतील याचा विचार करायचा मात्र मुलांना दम देऊन रागावून भिती दाखवून त्यांच्या कडून करवून घेणे म्हणजे शिकवणे असा सोयीस्कर अर्थ,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या मध्ये देखिल मुलांना वाचायचे आहे व त्यांना मार्गदर्शन करायचे आहे नोंदी ठेवायच्या आहेत मात्र यात फक्त नोंदीना महत्त्व दिलं गेलंय पळवत शोधण्यात येतात. हे शिक्षक म्हणतात त्यांनी असं सांगितलंय (शासनाने) काय सांगितल्या परीक्षा नाही मुलांना नापास करायचेच नाही मग आम्ही काय करायचं .स्वतःचे डोके फक्त पळवत शोधायला चालवायचे चांगल्या कामासाठी नव्हे. या जगात सर्वात वाईट गोष्ट कुठली असेल तर ती ही की ज्ञान कमी असणाऱ्या माणसांच्या हाताखाली काम करणं ना ते योग्य सांगणार ना आपले ऐकणार या सारखी दुर्दैवी बाबच नसेल पण असेच होत आहे.

आता नवीन जी आर नुसार शिक्षकाने मनन चिंतनासाठी वेळ द्यावा अध्यापन आठवड्यात ३० तास व चिंतन मनन, व शैक्षणिक साधन निर्मिती या साठी १५ तास असा वेळ द्यावा .या जी आर नुसार विद्यार्थी किंवा शिक्षकांना ८ तास शाळा नसून स्वतः मनन वाचन चिंतन आठवड्यात त्यांनी करावे अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ बऱ्याच माध्य.शाळांतून शिक्षकांना कामगारांप्रमाणे ८ तास काम असा लावला आहे व शाळांची वेळ सकाळी ९ ते ६ अशी केलेली आहे.त्या मुळे अगोदरच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास अशी अवस्था झाली आहे. खरं तर शिक्षकांनी तास या शब्दाचा अर्थ घड्याळी तास असा लावलाय मात्र तो तसा नसावा कारण शिक्षकाला एका आठवड्यासाठी ३६ तासिका असतात त्याचे घड्याळी तास १९.३० मी इतके होतात म्हणजे अध्यापनाचे तास पूर्वीप्रमाणे ३० असावेत असे म्हटले आहे .पण ३६ घेतले जात आहेत .

कामाच्या तासाच्या जी आर बाबत चुकीच अर्थ हा असा.