वादळाची जात अण्णा

वादळाची जात अण्णा
माणसे खंबीरतेने टाकतेया कात अण्णा
इंडियाला भावला हा एक झंझावात अण्णा
थाट सत्तेचा कसा हा काही केल्या आकळेना
भ्रष्ट नेते मोकळे अन कोठडीच्या आत अण्णा 
भ्रष्ट आचारास सत्ता हाच मुख्य स्रोत आहे
घाव घाला मुख्यजागी एकदा द्या मात अण्णा
एक आशेचा उमाळा शोधताहे देशवासी
चेतना चिंतामणीची भासते बरसात अण्णा 
आस अण्णा श्वास अण्णा, अभयतेचा ध्यास अण्णा
अग्निलाही भाजणार्‍या वादळाची जात अण्णा
                                             गंगाधर मुटे
----------------------------------