शिक्षकांची गळचेपी व त्यांचे अज्ञान!

माणसाला त्याचे अज्ञानच दु; खाच्या खाईत घेऊन जाते. आज महाराष्ट्रातील शाळांमध्ये (विशेषतः खाजगी संस्था रयत शिक्षण संस्था, स्वामीविवेकानंद शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे व त्याच बरोबर बऱ्याच स्थानिक संस्था ) यांनी आपल्या शाळांची वेळ शासन निर्णयानुसारवाढ्वलेली आहे. म्हणजे सकाळी १० ते सायं ६ वाजे पर्यंत अशी केलेली आहे. याला आधार शासनाने निर्गमित केलेला दि. २९ एप्रिल २०११ चे परिपत्रक(शैक्षणिक वर्षातील कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी आठवड्याला किमान तास निश्चित करणे)

परिपत्रकातील मुद्दे...

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अ धिनियम, २००९ मधील प्रकरण ४ कलम १९ (ए) अन्वये अधिनियमातील अनुसुची मध्येविनिर्दिष्ट केलेली माणके व निकष यानुसार प्रत्येक शिक्षकांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षामधील शिक्षकांच्या कामाचे किमान दिवस व शिक्षणाचे तासतसेच शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला शाळेतील कामाचे तास व शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत.

अ)इयत्त्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकाचे कामाचे दिवस किमान २०० इतके राहतील.

ब) इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शैक्षणिक वर्षात शिक्षकांचे कामाचे दिवस किमान २२० इतके राहतील.

क) इयत्ता पहिली ते पाचवी वर्गांसाठी शैक्षणिक वर्षातील अध्यापनाचे किमान घड्याळी तास ८०० इतके राहतील.

ड)इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील अध्यापनाचे किमान घड्याळी तास १००० इतके राहतील.

इ)प्रत्येक शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला पाठाची तयारी करण्यासह अध्यापनाचे किमान ४५ तास इतके राहतील. यात शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी १५ तास व प्रत्यक्ष शाळेतील शिकविण्याचे किमान ३० तासांचा समावेश असेल.

फ) पाठाची तयारी करण्यासाठी अध्यापनाचे ४५ तास याचा अर्थ शिक्षक किंवा विद्यार्थ्यांसाठी ८ तासांची शाळा असा होत नसून शिक्षक व विद्यार्थी यांच्या शाळेतील अध्यापन व अध्ययनासाठी पूर्वीप्रमाणेच ३० तास अपेक्षित राहतील. तसेच आठवड्यातून सहा दिवस किंवा पाच दिवस चालणाऱ्या शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात या निर्णयाचा अडसर राहणार नाही.

पाठाची तयारी, (म्हणजे शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास)पाठासाठी मुद्देनिहाय गोळा करावयाची माहिती वा साहित्य यासाठी स्पष्टीकरण पुढील प्रमाणे :-

अध्ययन अध्यापन विषयक साहित्य तयार करणे, पाठाचे टाचण तयार करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन विषयक नोंदी, तंत्र विकसित करणे, मुलांना शिकविण्यासाठी चांगले ज्ञानयुक्त पुस्तके वाचणे, अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांना चांगली प्रगती करण्यासाठी चिंतन करणे. क्रमिक पुस्तकांच्या जोडीने संदर्भ पुस्तके वाचणे यासाठी (एकूण १५ तास )राहतील.

असे हे शासनाने निर्गमित केलेले परिपत्रक

यात शिक्षकांसाठी आठ तासांची शाळा असा उल्लेख कुठेही नाही. खरं पाहता या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी (परिपत्रक न पाहता त्यावर विचार चिंतन वा मनन न करता) या परिपत्रकानुसार शासनाचा निर्णय आहे हे सांगून शिक्षकांना वेठबिगारासारखे सकाळी १० वाजल्या पासून सायं ६वाजे पर्यंत थांबायला लावलेले आहे. आणि शिक्षक सुद्धा आज्ञाधारक तसे वागतो आहे (मनातून शासनाला दूषणं देत) शाळांच्या मुख्याध्यापकांना या बाबत सूचना केल्या गेल्या त्या मुख्याध्यापक संघाच्या सभेत शिक्षणाधिकारी साहेबांनी फक्त तोंडी लिखित स्वरुपातनाही. शाळांतून ज्ञान दानाचे काम करणाऱ्या या शिक्षकांना देखिल या परिपत्रका बद्दल काहीच माहीत नसावे. ज्ञान देऊन अन्याया विरुद्धलढण्याचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला तरी खरंच ज्ञान आहे का? असा प्रश्न उभा राहतो. का त्यांचे अज्ञानच त्यांच्या दुःखाचे कारण होते आहे.

शाळांमधील वास्तवता या स्वरूपातील :----

सध्या शाळांमधून शिक्षकांना माध्यमिक शाळा संहिता सेवाशर्ती नियम ७३. १ व २ नुसार पूर्णं कालीक शिक्षक शाळेत दैनिक मध्यांतराच्या वेळेव्यतिरिक्त शाळेच्या गरजेनुसार आठवड्याला तीस तास कामाच्या वेळात उपस्थित राहील. ( घड्याळी तीस तास ), पूर्ण कालिक शिक्षक दर आठवड्यात १८ तास प्रत्यक्ष शिकविण्याचे काम करील सरासरी ५२ हून अधिक विद्यार्थी असलेल्या वर्गांना शिकविणारा शिक्षक दर आठवड्यात १७ तास प्रत्यक्ष अध्यापनाचे काम करील. सरासरी ३०किंवा त्या हून कमी विद्यार्थी असलेल्या वर्गांना शिकविणारा शिक्षक दर आठवड्याला १९ तास प्रत्यक्ष अध्यापन करील. शाळेच्या वेळापत्रकात दिलेले सर्व काम हे उल्लेखिलेल्या कामाच्या १७ ते १९ कामाच्या तासात समाविष्ट केले पाहिजे. ( इथे तास या शब्दाचा अर्थ घड्याळी तास असा आहे. )

शाळांतून सध्या शिक्षक यानुसार दररोज ३५ मिनीटाची. एक व ३० मि. चार किंवा पाच अशा तासिका वेळापत्रकात बसविल्या जातात. यात बसविणारा त्याच्या जवळचा लांबचा असा भेदभाव हा करतोच यात शंका नाही. म्हणजेच दररोज शिक्षक घड्याळी ३ तास ३५ मि. अध्यापन करतात. याची सरासरी आठवड्याला १९ घड्याळी तास अध्यापन करतात. वेळापत्रक बसविणाऱ्याच्या जवळचे १८ तास किंवा १८ तास. ३० मि अध्यापन करतात. (शासन निर्णयानुसार तर शासनाने ३० तास अध्यापन करावे असे सांगितले आहे. जर आत्त्ता शिक्षक १९ किंवा १८ तास अध्यापन करतात, जर ते ३० तास केले तर वेळापत्रक तयार करताना निम्मे शिक्षक रिकामे राहतील. त्यांचे काय? याचाच अर्थ असा की शासन निर्णयात जो तास शब्द उल्लेखिलेला आहे त्याचा अर्थ घड्याळी तास नाही.

मग आता शिक्षक आठवड्याला ३६ तासिका घेत आहेत. त्याच बरोबर गणित. इंग्लिश, विज्ञान, या विषयाचे जादा तास घेतात स्कॉलरशीप, प्रज्ञाशोध परीक्षेचे जादा तास हे शाळांतून नियमित घेतले जातात. याचाच अर्थ ४५ तास ते आधीच कार्यरत आहेत मग त्यांची अजून पिळवणूक का व कशासाठी. त्यातून शाळेचे अधिकारी विशेषतः पर्यवेक्षक शाळेची वेळ ८ तास केलीय त्यांनी सांगितल्यानुसार असे ठणकावून सांगतात, व शाळेतून जाताना मला विचारून गेले पाहिजे असा आग्रह धरतात. मात्र माध्यमिक शाळा संहिता सेवाशर्ती नियम व अटी यामध्ये कुठेही असा उल्लेख आढळत नाही की आपले काम झाल्यावरअधिकाऱ्याला विचारूनच कार्यस्थळ सोडावे. मग हि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अधिकारी मंडळी सुद्धा नाहक पिळवणूक करतात. काम समाजासाठी करायचं नोकरी शासनाची करायची पगार शासनाचा घ्यायचा आणि अशांच्या पुढे हुजरे गिरी करायची हि गोष्ट मला न पटणारी आहे. अशी माणसे राजकीय वरद हस्त यांचे नाव सांगून लोकांना त्रास कसा होईल हे पाहतात. इतरांना जेवढा त्रास होईल तेवढा या प्रवृतीच्या माणसांना जास्त आनंद होतो. मी यावर आवाज उठवतोय माहीत नाही माझ्या बाबतीत काय होईल अतिशय त्रास की आडवळणी गावात बदली.

कारण समाजातील वास्तव हेच आहे की, लोक बाभळीच्या झाडाला कधिच दगड मारत नाहीत, आंब्याच्या झाडाला मात्र दगड मारतात.

या समाजात बघितलं तर अजूनही अज्ञान आहे. पण शिक्षण क्षेत्रातच किती आहे याची परिणिती इथं येते. मी हा लेख लिहितोय पण हा वाचणारे कितीजण शिक्षक आहेत माहीत नाही., कारण बरेच शिक्षक संगणक वापराबाबत निरक्षरच आहेत प्फक्त शिक्षकच नव्हे तर अधिकारी वर्ग देखिल या बाबतीत निरक्षर आहेत हेच यातून सिद्ध होतंय, आणि त्यांचे अज्ञान हे त्यांनाच दु; खी बनवत आहे पण जे साक्षर आहेत त्यांना देखिल.

रविंद्र बनसोडे

ravi_094@yahoo.co.in