कितीदा ठोठवावी बंद दारे?
कशी माझी म्हणावी बंद दारे?
निघावे माणसांचा शोध घेण्या
तशी त्यांनी करावी बंद दारे?
समाजाच्या नव्या चित्रातली ही
प्रतीकात्मक असावी बंद दारे
सवय शहरातल्या डोळ्यांस झाली
कुणाच्याही न गावी बंद दारे
अताशा शिंगणापूरात देखिल
कडी-कुलुपे नि चावीबंद दारे...