डाव असतो जीवनाने मांडलेला
दाव असतो नेहमी मी लावलेला...
प्रश्न असतो जीवनाने टाकलेला
जीव असतो नित्य माझा टांगलेला...
मोडला नव्हता कधी माझा कणा
फक्त ओझ्याने सदोदित वाकलेला...
काळजी आता कशाची मी करू?
काळजावर घाव हा मी झेललेला...
जीवनाला घाबरू की मृत्युला?
'अजब' असतो मी मनातच भ्यायलेला...