दिसते पुढे की आग आहे

दिसते पुढे की आग आहे
पण चालणेही भाग आहे

खोडी तिची मी काय केली?
कां जिंदगीचा राग आहे?

बघता ठसे श्वापद म्हणाले
"हा माणसांचा माग आहे"

संपून ती शृंगार गीते
ओठी अभोगी राग आहे

नेतील स्वप्ने चोर म्हणुनी
डोळा कधीची जाग आहे

ना बोलणे ना हासणे पण
हाही तिचा अनुराग आहे

वैद्यास त्या सांगू कसे मी?
आत्म्यावरी हा डाग आहे

------------------------------जयन्ता५२