नक्षीदार पराठे

  • पालक पेस्ट १ वाटी (थोड्याश्या पाण्यात वाफवून पेस्ट करावी)
  • अर्धा चमचा आले-लसुण पेस्ट
  • १ किसलेला गाजर
  • थोडी कोथिंबीर चिरुन
  • हिंग, हळद
  • गोडा मसाला १ चमचा
  • मिठ
  • साजूक तुप
  • गव्हाचे पिठ अंदाजे ३ वाट्या
२० मिनिटे
प्रत्येकी २

दुवा क्र. १ a="">दुवा क्र. २दुवा क्र. ३

पाककृती:
तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे  मळून घ्या. पाणी आधीच जास्त घालू नका कारण पालकाच्या पेस्टचा आधीच ओलसरपणा असतो. मळून झाले की चमचाभर तेल टाकून त्यातून गोळा मळा म्हणजे पिठ चिकटणार नाही (आता रोज चपात्या करणाऱ्या मला म्हणतील ही काय सांगते आम्हाला? :हाहा:)
दुवा क्र. ४ a="">दुवा क्र. ५दुवा क्र. ६

आता गोळे करून पराठे लाटा बघा कशी नक्षी तयार झाली (पुर्वी बांगडीच्या तुकड्यांची अशी नक्षी केलीच असेल तुम्ही)
दुवा क्र. ७ a="">दुवा क्र. ८दुवा क्र. ९

चला आता तव्यावर टाका आणि भाजताना मस्त साजुक तुपाची धार पसरवा. कसा खमंग वास पसरतो.
दुवा क्र. १० a="">दुवा क्र. ११दुवा क्र. १२

सॉस,   चटणी कशाही बरोबर खा.
दुवा क्र. १३ a="">दुवा क्र. १४दुवा क्र. १५

ह्यात अजून मटारची पेस्ट करून टाकू शकता, मेथी चिरून टाकू शकता.
असेच बिट वाफवून त्याची पेस्ट करुनही टाकू शकता पण ते पराठे पुर्ण लाल होतात.
आले-लसूण पालकातच टाकून पेस्ट केली तर वेळ वाचतो.

स्वतःचेच प्रयोग