ओल्या हळदीचे लोणचे

  • ओली हळद - ३ इंचाचे मोठे तुकडे-२, आले- ३ इंचाचा १ तुकडा
  • आंबेहळद (ओली मिळाल्यास- एक छोटा तुकडा)- ऐच्छिक, दोन मिरच्यांचे तुकडे- बारीक चिरून
  • मिरची लोणचे मसाला- केप्र- २ चमचे, एका लिंबाचा रस, मीठ - २ चमचे
  • तेल, मेथ्या व इतर फोडणीचे साहित्य
१० मिनिटे
३-४ जण

ओली हळद, आले व आंबे हळद स्वच्छ धुवून, कोरडी करून घ्यावी. जाड किसणीने किसून एका बाउल मध्ये एकत्र करावे. त्यात लिंबाचा रस, मसाला, मिरचीचे तुकडे व मीठ घालावे. एक डावभर तेलाची हिंग, मेथ्या घालून, खमंग फोडणी करून त्यावर जरा थंड झाल्यावर ओतावी. सर्व मिश्रण नीट कालवून नंतर एका कोरड्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावे.

रुचकर आणि पथ्यकर (बाळंतीणीलाही चालणारे) असे तोंडीलावणे म्हणून ओल्या हळदीचे लोणचे तयार आहे!

हिवाळ्यातील पहिली आरोग्यवर्धक पाककृती 

स्वतः