मीच सुखाची हकालपाट्टी होती संमत केली
एकलेपणा? छे! दु:खानी माझी संगत केली
बेचव गुळमट सुखास विटले, त्यांच्या सोबत होती
चटकदार दु:खाची आम्ही अंगतपंगत केली
दहा दिशांच्या आत कशाला सीमाबध्द असावे?
दिशा आकरावी शोधाया थोडी हिंमत कली
हे न मिळाले, ते न मिळाले रडणार्यांची होती
चार वाकुल्या दावुन थोडी गंमत जंमत केली
सरळ वागणे, खळखळ हसणे कालबाह्य का झाले?
मला भोवले लाघव माझे ज्यने फसगत केली
हाक मारली मदतीसाठी उगाच मी का त्यांना?
वर्दीवाल्यांनी गुंडांची किती वकालत केली!
पाय घसरण्याच्या चिंतेने ग्रस्त जाहले त्यांनी
रस्त्यावरती चालायाची कधी न हिंमत केली
चूक जगाची, माझी नाही हिशोब करता करता
शुन्यासंगे मला गुणूनी माझी किंमत केली
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३