"फ्लॅश मॉब" नक्की कशासाठी ?

हल्ली अनेकदा फ्लॅश मॉब बघायला मिळत आहेत. अगदी नुकते मुंबई आणि सोलापूर येथील पाहिले.

हे नक्की काय असते तर रस्त्यावर किंवा स्टेशनवर इ. ठिकाणी अनपेक्षितपणे एखादे लोकप्रिय गाणे जोरात वाजवतात आणि एखादा मुलगा/मुलगी एकदम मध्येच उभे राहून अचानक गाण्यांवर डान्स करायला लागतो आणि एकामागून एक त्याचे सहकारी त्याला येऊन मिळतात आणि त्या गाण्यावर सगळे हुबेहूब हातवारे करून नाचतात. सहकार्यांची संख्या पण एक एक करीत पन्नास साठ वर वगैरे अशी पोहोचते. सगळे लोक कुतूहलाने ते पाहत गर्दी करतात.

नाच संपला की सगळे नाचणारे काही घडलंच नसल्यासारखे एक एक करून गर्दीच्या बाहेर पडतात .. सगळा जमाव मग हळूहळू पांगतो आणि रहदारी किंवा वाहतूक परत एकदा सुरळीत चालू होते.

हे नक्की कशासाठी आणि कोण लोक करतात ? या उद्योगामागचे कारण काय असावे?