टाक

कागदाने बांग देता, करत निद्राभ्यास टाक
हलविता लिहिते कराया, कुरकुरे उठण्यास टाक

भावभक्तीचा उमाळा अंतरी असल्याशिवाय
औपचारिक कागदी करणार अक्षरन्यास टाक

कल्पना होत्या तलम अन् शब्दही नाजूक, तरल
का तरी नाराज त्यांना मूर्तता देण्यास टाक?

माणसाच्या अनुभवांची विविधता असता असीम
संकुचित शब्दात करण्याचा धरी हव्यास टाक

कोरडा जर आड, 'भृंगा', पोहर्‍याचा काय दोष?
बोरूघाशाला करू शकणार नाही व्यास टाक