रामदेवबाबा आणि अण्णा

रामदेवबाबा व अण्णा दोन्ही वैरागी ( विरक्त) पण दोघांनाही आता समाज सुधारणे साठी राजकारणात हस्तक्षेप करावासा वाटू लागला आहे. म्हणून मुद्दाम हे पत्र.

अण्णांनी जरी महात्मा गांधीचा मार्ग अनुसरला होता तरी मध्यंतरी कधीतरी पत्रकारांनी छेडल्यावर मी जरी गांधी मार्गाचे अनुसरणं करीत असलो तरी शिवाजी महाराज देखील मला वंद्य आहेत असे म्हटले होते.

तेव्हा अण्णा व रामदेवबाबा एकत्र आले. तर छत्रपती शिवाजीमहाराज व समर्थ याप्रमाणे शोभतील.सध्याच्या निवडणुका या  लोकप्रियतेवर नव्हे तर पैशावरच जिंकत असावेत असे वाटते म्हणून त्यांनी एकत्र आल्यावर त्यांनी शिवाजीमहाराजाप्रमाणेच लढा द्यावा तरच ते शक्य वाटते.