साबुदाण्याचे थालिपीठ

  • २ वाट्या साबुदाणा
  • १ मध्यम आकाराचा बटाटा
  • मिरची
  • जिरे
  • मीठ, साखर
  • दाण्याचे कूट
३० मिनिटे
२ लोकांसाठी

साबुदाणा सुमारे १ १/२ तास आधी भिजवून ठेवावा.

भिजलेल्या साबुदाण्यामधे कच्चा बटाटा किसून घालावा. त्यात मिरची-जिरे यांची पेस्ट घालवी. मीठ, साखर आणि दाण्याचे कूट घालावे. गोळे करता येतील इतपत पाणी घालावे.

न चिकटणार्या तव्यावर तूप घालून हे गोळे थापून घ्यावेत. थालिपीठावर मधे १ आणि कडेला ४ अशी छोटी भोके बोटाने पाडून त्यात तूप सोडावे. मंद आचेवर खरपूस भाजावे.

काकडीची कोशिंबिर आणि दही याबरोबर गरमागरम खावे.

नाहीत.

सौ आई