देव राहतो नभी - भूवरी नि मी

देव राहतो नभी - भूवरी नि मी
ह्या दिशेस तो अता - पाहतो कमी ।ध्रु।

तो अलीकडे कुणा - हटकतो कुठे?
काहिही करो कुणी - अटकतो कुठे?
बॉंबस्फोट, दंगली - रोज बातमी ।१।
ह्या दिशेस तो अता - पाहतो कमी

व्यर्थ तो कुणा इथे - पाठवायला!
ह्या समस्त गर्दिची - दखल घ्यायला
माणसे असंख्य पण - देवता कमी ।२।
ह्या दिशेस तो अता - पाहतो कमी

जे असे बरे असे - वाच्यता नको
जगत-काळजी मधे - व्यग्रता नको
त्यास दुःख ना जिथे - का करेन मी? ।३।
ह्या दिशेस तो अता - पाहतो कमी

पर्याय : १. लूटमार, बॉम्ब हे - वृत्त नेहमी

टीपा : ओळी छोट्या आणि गालगालगालगा ... असे कठीण वृत्त त्यामुळे भाषांतर भावार्थाने केलेले आहे.
चाल : मूळ गाण्याचीच!   (गालगालगालगा - गालगालगा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.  कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे  शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ..   अमी शी जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहेच.