तू नभीचा चंद्रमा असशी, धरेची धूळ मी

तू नभीचा चंद्रमा असशी, धरेची धूळ मी
तू प्रणय देवच, तुझ्यावरती समर्पित फूल मी
तूच पूजा, मी पुजारी, तू सुधा अन्‌ तहान मी
तू महासागर-किनारा, अन्‌ तटीची लाट मी
तू महा संगीत-स्वर हे, अन्‌ अपूरा श्वास मी
देह तू, तव सावली मी, तू क्षमा अन्‌ चूक मी
तू उषेचा लालिमा, असशी उषेचे कुंकू तू
माझ्या प्राणांचे तू गुंजन, मनमयूरही तूच तू
तूच पूजा, मी पुजारी, तू सुधा अन्‌ तहान मी
मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत?