मराठीतील शुद्धचिकित्सक आणि स्वयंसुधारणा

मनोगतासारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. मनोगतावरील स्पेल चेक व अ‍ॅटो करेक्ट हे त्याचे बलस्थान आहे. पण त्यासाठी सतत इंटरनेटवर राहावे लागते आणि कळत / नकळत खूप खर्चही होतो. जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अ‍ॅटो करेक्ट, अ‍ॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईन सॉफ्टवेअरला पर्याय नाही. लिबर ऒफिस हे  सॉफ्टवेअर आणि मी बनवलेले स्पेल चेक एक्स्टेन्शन वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल. आणि आपण विचारांच्या वेगाने मराठीत टायपू लागाल.

देवनागरीत टाईप करण्यासाठी 1) बराह 2) एन्. एम्. एच्. रायटर  आणि 3) गूगल ट्रान्सलिटरेशन असे चांगले पर्याय आहेत.  चौथा पर्याय म्हणजे विंडोज मधील देवनागरी सुविधा सुरु करणे.

लिबर ऒफिस वर्ड प्रोसेसरः
लिबर ऑफिस शक्यतो ४.० आवृत्ती (पूर्वाश्रमीचे नावः ओपन ऑफिस) येथून...
दुवा क्र. १

ओपन ऑफिसचेच नवे नाव लिबर ऑफिस. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखेच काम करते. यात युनिकोड सपोर्ट खूप चांगला आहे.

स्पेल चेक व अ‍ॅटो करेक्ट:
दुवा क्र. २

लिबर ऑफिस ३+ आणि लिबर ऑफिस ४+ साठी वेगवेगळ्या फाईल्स वर दिल्या आहेत. त्यातील आपल्या वर्जनला अनुरूप फाईल उतरवून घ्या. ओपन ऑफिससाठी लिबर ऑफिस ३ ची फाईल वापरता येते.

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये adn टाईप केले की लगेच त्याचे and होते. हे झाले अ‍ॅटो-करेक्टचे उदाहरण. तसेच लाल खुणांनी स्पेल-चेकही घेतला जातो. इंग्रजीतील या गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत. याच सुविधा मराठीतही वापरता येतील. त्यासाठी वर दिलेले अ‍ॅड-ऑन लिबर ऑफिसच्या रायटरमध्ये डबल क्लिक करून किंवा फाईल - ओपन हा पर्याय वापरून टाकावे लागेल.

फायरफॉक्ससाठी हेच एक्स्टेंशन येथे उपलब्ध आहे. पण त्यात अ‍ॅटो करेक्ट नाही, फक्त स्पेल चेक आहे.
दुवा क्र. ३

यू ट्युबवर हा व्हिडीओ मी अपलोड केला आहे.
दुवा क्र. ४