शब्दगाणे

हा खेळ असा आहे की गाण्याच्या ओळींमधून एक शब्द निवडायचा आहे आणि पुढचे गाणे द्यायचे आहे. जो शब्द निवडला असेल तो गाण्याच्या सुरवातीलाच यायला पाहिजे असे नाही. गाण्याच्या कमीत कमी दोन ओळी हव्यातच. चार किंवा सहा ओळी दिल्यात तर शब्द निवडायला सोपे जाईल. समजा गाण्यांच्या ओळीमध्ये शब्द निवडता येत नसेल तर त्या ओळींमधला एखादा शब्द मुडपून दुसरा शब्द निवडा. काही वेळेला शब्द निवडायला कठीण होऊन बसते. त्यावेळेला मग खेळ पुढे नेण्याकरता कोणताही एक शब्द घेऊन पुढचे गाणे द्यायचे.

उदाहरण : जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते ,,,, या ओळींमधले तुम्हाला आवडेल तो शब्द निवडा.

जसे की वाट  शब्द निवडला तर "ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा"

आता शब्द मुडपायचा म्हणजे मिळते चा मिळाल्या असा शब्द करायचा,, किंवा तुझी या शब्दाचे तुला, किंवा तिथे हा शब्द तिथल्या असा करून वापरायचा,,,सहज शब्द निवडता येत नसेल तरच तो मुडपायचा अन्यथा नाही.

आता खेळ सुरू

रुणुझुणुत्या पाखरा जारे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा

आता यातून तुम्हाला आवडेल तो शब्द निवडा व पुढचे गाणे द्या.