साठी-शांत किंवा एकसष्ठी बद्दल जरासे

नमस्कार लोकहो,

माझ्या वडिलांची नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि आम्ही सगळे साठी शांत करायच्या विचारात आहोत, त्याबद्दल कोणा वाचकाला/लेखकाला माहीत असल्यास मार्गदर्शन करू शकाल काय ?

 गुरुजींना फोन केला परंतु आमचे नेहमीची गुरुजी गावाला गेले असल्याने ते पुढील महिन्यात परत येतील, तोपर्यंत जमेल तेवढी माहीती मिळवण्याचा सर्वपरीने प्रयत्न करावा म्हणून हा खटाटोप.

साठी शांत कधी करतात, विधी काय असतात, त्या व्यक्तिव्यतिरीक्त प्रमुख सहभाग कोणाचा असतो.. (जसे लग्नात मुलीला भाऊ कानपिळीसाठी वगैरे)

आणि समजा साठी ची वेळ आधीच उलटली (60th birthday was on Jan22 ) असेल तर एकसष्ठी बद्दल काही सांगू शकाल काय ?

आपला,

वळू !