शब्द्शोध छेडाछेड, टिंगलटवाळी

 दै. सकाळ (दि.६-४) मधील शब्दकोड्यात 'महिलांची टिंगलटवाळी' साठी शब्दयोजना विचारलेली आहे. '-ड-' असा शब्द तेथे येतो. छेडछाड हा शब्द तेथे अपेक्षित आहे. हा शब्द मराठी शब्दरत्नाकर मध्ये मिळत नाही. महा. सरकारने प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशात छेडाछेड शब्द आहे. त्याचप्रमाणे टिंगलटवाळी या शब्दाचेही आहे. अर्थ पाहताना छेडाछेड आणि छेडछाड या शब्दातील बारकावा लक्षात घेता येतो.