आजकाल केवढे फुशारतात काजवे!

गझल
आजकाल केवढे फुशारतात काजवे!
कोण सूर्य, कोण चंद्र.....बोलतात काजवे!!

वासरांमधील लंगडीच सूज्ञ गाय ते!
दबदबा पहा कसा निभावतात काजवे!!

भक्त कैक भोवती, अनेक भाट सोबती...
होउनी हुजूर ते चकाकतात काजवे!

गोडव्यांत गुंतती, स्तुतीमुळेच झिंगती!
कूपमंडूकांसमान डोलतात काजवे!

झापडांमुळेच ना समुद्र पाहिला कधी!
आपल्या तळ्यामधेच डुंबतात काजवे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१