सखी तू
श्रावणी मेघापरी
मायेने ये ओथंबून
सखी तू
श्रावणी उन्हापरी
मनाने ये उजळून
सखी तू
श्रावणी इंद्रधनूपरी
सप्तरंगात घे न्हाउन
सखी तू
श्रावणी हिर्वाईपरी
नवलाईला घे टिपून
सखी तू
श्रावणी सणांपरी
मांगल्याला घे पांघरून
सखी तू
श्रावणी लपंडावापरी
सुख-दुःखाला घे चुंबून
सखी तू
श्रावणी उल्हासापरी
जगाला घे जिंकून
सखी तू
श्रावणापरी होउनी श्रावण
घे आयुष्य जगून
सखी तू......!!!....!!!...!!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.