धमक

तोवरी हासण्याची धमक आहे
जोवरी आसवांची कुमक आहे
तो विधाताच पहिला कवी होता
दुःख म्हणुनी सुखाचे यमक आहे
देह कां उजळला येव्ह्ढा माझा?
ही तिच्या सावलीची चमक आहे
हारता मी, कशी हासते दुनिया
'मी' जगाच्या सुखाचे गमक आहे!
------ जयन्ता५२