गीत (सांज)

(तोः ) साथ सांजेस त्या पाहिले रंग ते, लेवुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?
(तीः) सांजवाऱ्याप्रमाणे मला स्पर्शण्या, धावुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

(तीः) ते क्षणांचे सखे! रंग विरतात ना...
(तोः ) पण स्मृती होउनी रंग उरतात ना!
तू मनाला तुझ्या हे पुनः आज समजावुनी , सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

(तोः ) वागतो स्वैर वारा किती नेहमी
(तीः) मुक्त चैतन्य तो, काय त्याला कमी?
तू स्वतःला जरा एवढे आज उंचावुनी, सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

- कुमार जावडेकर