"मनोगत ह्या शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द

"मनोगत ह्या शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द कोणी सांगू शकेल का? 
उदा. या लेखाद्वारे मी माझे मनोगत व्यक्त करू इच्छितो. 
एक्झीस्टींग इन द माइंड, थोट,  इंटेंंट, माइंड, परपस,  हे इंग्रजी प्रतीशब्द चपखल बसत नाहीत. "माझ्या मनातील एक गुजगोष्ट मला सांगायची आहे", हा भाव ह्या इंग्रजी शब्दांतून उद्घृत होत नाही.
काही मदत मिळाल्यास आभारी आहे.
धन्यवाद