'शोले'चा पर्यायी शेवट

शोले हा चित्रपट १९७५ साली आला. तेव्हापासून आजपर्यंत चित्रपटगृहात, दूरचित्रवाणीवर, कॅसेटवर, डिस्कवर हा चित्रपट कितीदा पाहिला ह्याची मोजदाद नाही. ह्यापूर्वी जेव्हा जेव्हा पाहिला तेव्हा शेवटी ठाकूरने गब्बरला मारून टाकण्याआधी पोलीस येतात व ठाकूरला (चित्रपटांतील नेहमीचे) भावनिक आवाहन करून गब्बरला पकडून घेऊन जातात. आज मात्र सिने मस्तीनामक वाहिनीवर शोले पाहिला तेव्हा वेगळा शेवट दिसला. ठाकूर व गब्बरची शेवटची हाणामारी चालू असताना व गब्बर गलितगात्र झाला असताना ठाकूरला गब्बर ज्या दगडी खांबापुढे उभा असतो त्यातून बाहेर आलेली आडवी तीक्ष्ण सळी दिसते. तो लाथ मारून गब्बरला त्या सळीवर धकलतो, सळी गब्बरच्या पाठीतून घुसून छातीतून निघते व गब्बर गतप्राण होतो.

हा दुसरा शेवट माझ्यासाठी नवीन होता. ह्याविषयी कोणाला काही माहिती आहे का? ह्याव्यतिरिक्त आणखी एखादा तिसरा शेवटही अस्तित्वात आहे का?