व. पु. काळे (भाग एक)

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.


आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो.त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.


असंच माणसाचं आहे.......


समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो.पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.


                                                      -- व. पु. काळे