चीनी कोंबडी रस्सा (चीकन मंचूरीयन)

  • १/२ किलो कोंबडीचे मांस (शक्यतो हाड विरहीत).
  • लसूण १०-१२ पाकळ्या.
  • २ हिरव्या मिरच्या.
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • २ अंडी.
  • मक्याचे पीठ १/२ वाटी.
  • तांदळाचे पीठ १/२ वाटी.
  • मीठ चवी नुसार.
  • १ भोपळी मिरची.
  • तेल तळ्ण्यासाठी
  • सोया सॉस चवी नुसार.
  • तिखट गोड टोंमॅटो सॉस चवी नुसार.
३० मिनिटे
४ जणांसठी

पुर्व तयारीः

   कोंबडीचे साधारण १ इंची  तुकडे करुन त्यांस मीठ लावून ठेवावं.

   मिरची, आलं, लसूण यांचे बारीक बारीक तुकडे करुन ठेवावे.

    भोपळी मिरचीचे (अंदाजे १/२ इंच X ३ मी.मी.) बारीक तुकडे करुन ठेवावे.

     एका भांड्यात मक्याचे  व  तांदळाचे पीठ एकत्र करुन त्यात चीमूट भर मीठ आणि २ अंडी (फोडुन) टाकुन चांगले एकजीव मिश्रण करावे. (भजी करताना करतो तसे पीठ करावे.)

कृतीः

   एका कढईत कोंबडीचे तुकडे तळण्यासाठी तेल टाकावे.  तेल चांगले तापले की त्यात कोंबडीचे तुकडे (अंडी आणि पीठाच्या) मिश्रणात घोळवुन मंद आचेवर तळुन घ्यावे.  तळलेले तुकडे एका भांड्यात काढून ठेवावे.

   दुसऱ्या भांड्यात २-३ चमचे तेल गरम करुन त्यात बारीक चीरलेली मिरची, लसूण व आलं टाकावे. 5 चमचे सोया सॉस आणि  5 चमचे तिखट गोड टोंमॅटो सॉस टाकून चांगले ढवळावे. बारीक चीरलेली भोपळी मिरची टाकून परत ढवळावे. १ वाटी पाण्यात १ १/२ चमचा मक्याचे पीठ टाकून ते मिश्रण यात टाकून मंद आचेवर ढवळावे.  चवी नुसार मीठ टाकावे.  कोंबडीचे तळलेले तुकडे टाकून मंद आचेवर ५ मिनीटं ठेवावं.

 

 

चीनी शेवयां सोबत हा पदार्थ लज्जत वाढवतो.

स्वानूभव