वसंतराव,पु.ल - आठवणी

डॉ.वसंतराव देशपांडयांच्या काही आठवणी खाली देत आहे.


ही वसंतरावाबद्दलची आठवण 'पु.ल' नी लिहिलेली आहे.ती बहुतांशी पु.लंच्या शब्दातच देत आहे.

डॉ.वसंतराव देशपांडयाच्या एका मैफिलीत एक बुजुर्ग गायकबुवा पहिल्या रांगेतच बसले होते. पूर्ण मैफिलीभर त्यांच्या चेहऱ्यावर 'नुकतेच तीर्थरुपांचे और्ध्वदेहिक उरकून' आल्यासारखे भाव होते. गाणं संपल्यावर आंत येऊन,ते बुवा खवचटपणे वसंतरावांना म्हणाले "अरे वसंता, तू आताशा चांगला गायला लागलास की!"
वसंतराव म्हणाले 'बुवा, मी सुरवातीपासून चांगलाच गातो, तुम्हाला चांगलं गाणं आता कळायला लागलय !!


ही वसंतरावाबद्दलची आठवण मी ऐकलेली आहे.

हॉलमध्ये डॉ.वसंतराव देशपांडयाची मैफल रंगात आली असतांना त्या हॉलची मोडकी खिडकी दुरुस्त करण्यासाठी एक सुतार आला. त्याची "ठक ठक'' सुरू झाल्यामुळे वसंतरावानी गाणे थांबवले व "ठक ठक'' संपायची वाट पाहू लागले. मैफल थांबलेली पाहून तो सुतार वसंतरावांना म्हणाला ' तुमचं चालू द्या. मला काही त्रास होत नाहीय!'


जयन्ता५२